गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

'तिसरी आघाडी म्हणजे बेडकांची जमात'

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे निमंत्रक व जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष शरद यादव यांनी तिसरी आघाडी म्हणजे बेडकांची जमात असल्याचे सांगून डावे पक्ष वगळता या आघाडीत काही दम नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

'ही बेडकांची जमात फार काळ एकत्र राहू शकणार नाही, असे सांगून राजकीयदृष्ट्या त्यांचे महत्त्वही उरणार नसल्याचे भाकित त्यांनी केले आहे. श्री. यादव यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांची काल भेट घेतली होती. त्यावर विचारले, असता, युपीए आघाडीच्या नेत्यांनीही येचुरींची भेट घेतली आहे, याकडे लक्ष वेधून या भेटींचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे म्हटले.