गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

सुनील मोरेला जामीन नामंजूर

मुंबईतील मरिन ड्राइव्हवरील पोलिस बुथमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने 12 वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या सुनील मोरेचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

मुंबई खंडपीठाचे न्यायाधीश एस.बी. म्हस्के आणि व्ही.के.तहिलरमानी यांनी ही याचिका फेटाळून लावली. अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश के यू चंदीवाला यांनी 3 एप्रिल 2006 रोजी मोरेला 12 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

21 एप्रिल 2005 ला मोरेने मरिन ड्राइव्हवर मित्रासोबत फिरण्यासाठी आलेल्या एका मुलीवर पोलिस बुथमध्येच बलात्कार केला होता.