शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (17:01 IST)

देशभरात गाजत असलेल्या राफेल लढाऊ विमान व्यवहारप्रकरणाची महत्त्वाची कागदपत्र चोरीला

मोठी बातमी आहे, देशभरात गाजत असलेल्या राफेल लढाऊ विमान व्यवहारप्रकरणाची महत्त्वाची कागदपत्र चोरीला गेली आहेत. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकार तर्फे  महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. 
 
राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. मात्र या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.जी कागदपत्रं गहाळ झाली आहेत, त्यावरुन द हिंदू या वृत्तपत्राने बातम्या छापल्याचं महाधिवक्ते के के वेणूगोपाल यांनी कोर्टात सांगितलं. याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं ते म्हणाले आहेत. राफेल विमान व्यवहारप्रकरणी दोन पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. 
 
पहिली पुनर्विचार याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि अॅडव्होकेट प्रशांत भूषण यांची, तर दुसरी याचिका आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दाखल केली आहे.महाधिवक्त्यांनी कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती दिल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांची कानउघाडणी केली. 'कागदपत्रं चोरीला गेल्यानंतर सरकारनं काय पावलं उचलली?,' असा प्रश्न गोगोई यांनी महाधिवक्त्यांना विचारला आहे. इतकी महत्वाची कागदपत्रे चोरीस जाताच कशी असा प्रश्न आता उभा राहिला आहे. इतक्या गंभीर प्रकाराबद्दल सरकार वर आता विरोधो पक्ष जोरदार टीका करणार हे नक्की.